कर्जत | मुंबईच्या जवळच्या शहरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे, मध्य रेल्वेने कर्जत-पनवेल दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन मार्गाुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पनवेल-कर्जत दरम्यान २९ किलोीटरचा मार्ग तयार केला जाईल, ज्यासाठी ४९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
तसेच, पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल. कर्जत ते पनवेलदरम्यान सध्या एक मार्गिका -कर्जत ते पनवेलदरम्यान सध्या एक मार्गिका कार्यरत आहे. याच मार्गावरून अप आणि डाउन मेल-एस्प्रेसची वाहतूक होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी - ३ अंतर्गत ५६ किलोीटर लांबीच्या दोन मार्गिका उभारण्यात येत आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एमयूटीपी ३ प्रकल्पसंचासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती लक्षात घेत शहरालगतच्या नवनगरांध्ये घर घेण्याकडे कल वाढला आहे. यात कर्जत-पनवेल अशा शहरांकडे नागरिकांचा ओढा अधिक आहे. भविष्यातील गरजा ओळखून मध्य रेल्वेने कर्जतपनवेलदरम्य ान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या रेल्वे मार्गासाठी ४९१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर नव्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे.
पनवेल-कर्जत (चौक) दरम्यान २९ किमीची रेल्वे मार्गिका -
महामुंबईतील रेल्वे जाळे वाढवून प्रवाशांना आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी कर्जत ते पनवेलदरम्यान एक नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत (चौक) दरम्यान २९ किमीची रेल्वे मार्गिकेसाठी ४९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे मंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्ग -
नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम ७१ टक्के पूर्ण झाले आहे. मार्गादरम्यान पाच रेल्वे स्थानकांतील सेवा इमारतींच्या बांधणीसह कर्जत आणि पनवेल येथे उड्डाणपूल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. महामुंबईतील सर्वांत म ोठे बोगदे याच प्रकल्पात आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. नऊपैकी ६ मोठे पूल आणि ३५ पैकी ३३ पुलांचे कामही पूर्ण झाले आहे. २,७८२ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
प्रवाशांना लाभदायी
नवी मुंबईत नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. नव्या विम ानतळापासून पनवेल रेल्वे स्थानक केवळ १७ किलोीटरवर आहे. विमानतळाला महामार्गासह मेट्रो आणि रेल्वे जोडणी देण्यात येणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकां ुळे याचा मोठा लाभ प्रवाशांना मिळेल. लोकसंख्या वाढीनंतर उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या यांसाठी सम र्पित मार्गावरून रेल्वे वाहतूक करणे शय होणार आहे.