अवकाळी पावसाने सुधागडला झोडपले , वादळी वार्‍यासह तुफान पाऊस

पाली-खोपोली महामार्गावर झाडे कोसळली

By Raigad Times    14-May-2025
Total Views |
pali
 
पाली | अवकाळी पावसाने मंगळवारी (१३ मे) दुपारी पाली, परळी, पेडली, महागाव, नांदगावसह सुधागड तालुयाला झोडपून काढले. दुपारी सुधागडात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुयात जनजीवन विस्कळीत झाले. पाली खोपोली राज्य मार्गावर परळीसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटून पडल्या.
 
त्यामुळे परळी बाजारपेठेत काही वेळ वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सततच्या पडणार्‍या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे दुबार शेतीसह, वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
 
pali
 
तर लग्नसराईचा शेवटचा टप्पा बाकी असताना अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. गावोगावी उभे असलेल्या लग्न मंडपांचा भिजून चिखल झाला. त्यामुळे मंडप व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गटारे, नाले तुडुंब भरली आहेत. मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा सुधागड तालुयात वादळी वार्‍यासह धुडगूस घातला. झाडे उन्मळून पडल्याने पाली खोपोली राज्य मार्गावरील वा ह त ू क विस्कळीत झाली होती. मात्र मोहिते कंस्ट्रशनचे मालक पी.डी. मोहिते यांनी आपले स्वतः चे जेसीबी मशीन पाठवून महामार्गावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.