माणगाव | इंदापूर येथे दोन टेम्पोचा अपघात , आठ जखमी

By Raigad Times    13-May-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांच्या मालिकेचे सत्र सुरूच आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजन जवळ आयशर टेम्पो व छोटा हत्ती टेम्पोत अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, ११ मे रोजी सकाळी ५.३० वा.च्या सुमारास आरोपी नरेंद्रसिंग रजपूत, वय ३० वर्ष यांने त्यांचे ताब्यातील आयशर टेम्पो क्र.जी.जे. १८ बी. व्ही ७१५१ हा गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे चालवित जात असतान मौजे इंदापूर येथील महामार्गावर असलेल्या डयव्हरशनने न वळता सरळ जाऊन मुंबई बाजूकडून येणार्‍या छोटा हत्ती टेम्पो क्र. एम. एच ४७ ए. एस ५८८९ ला समोरुन धडक देऊन अपघात केला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
 
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. फडताडे करीत आहेत.