युद्धाच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद ठिकाणी असलेल्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी करावी , मनसेची मागणी

By Raigad Times    13-May-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | दहशतवादी कारवाया आणि कुरापती करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध भारताने रणशिंग फुंकले असताना कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जत शहर आणि तालुयाच्या विविध भागात राहणारी संशयास्पद हालचाली करणार्‍या आणि संशयास्पद वाटणार्‍या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडावी, त्यात अशा लोकांची कसून चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने कर्जत पोलीस यांना देण्यात आले.
 
सद्यस्थितीत देशात असलेली युद्धसदृश्य परस्थिती पाहता कर्जतशहर व ग्रामीण भागातील पेट्रोल पंप, सर्व अस्थापना, फार्म हाऊस, रिसोर्ट व फळ भाजी विकण्यासाठी बाहेरून आलेले सर्व कर्मचारी व विक्रेते यांची पोलिसांनी संपूर्णपणे कसून चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना देण्यात आले.
 
यावेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे, मनसे रायगड जिल्हा सचिव अक्षय महाले, कर्जत नगरपरिषद माजी स्वीकृत माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, मनसे कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे, मनसे विद्यार्थी सेना अवधूत अत्रे, मनसे महिला सेना कर्जत माजी अध्यक्ष भारती कांबळे उपस्थित होते.