गोदरेज प्रोजेटच्या कामात स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने भाजप आक्रमक

ग्रामस्थांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

By Raigad Times    10-May-2025
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली | नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील नावंढे परिसरातील १०१ एकर जमीन गोदरेज वूड कंपनीने कवडीमोल भावाने खरेदी केली असून या जमिनीवर गोदरेज कंपनीच्या माध्यमातून प्लॉटिग करण्याचे कामात स्थानिक तरूणांना शेतकर्‍यांना रोजगार मिळेल अशी अशा होती. परंतु व्यवस्थापकांनी स्थानिकांना रोजगार देण्यास टाळाटाळ करीत असल्याने भाजपचे नेते आक्रमक झाले.
 
माजी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर सदर प्रकार सांगितल्यावर भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले यांच्या नेतृत्वाखाली नावंढे ग्रामस्थांनी दि. ७ मे गोदरेज व्यवस्थापक आणि खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन पवार यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसात स्थानिकांच्या हाताला काम दिले नाहीतर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
 
भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामस्थ जगदीश आगिवले, रामदास आगिवले, बंधू आगिवले, वासुदेव आगिवले, परशुराम आगिवले, विलास आगिवले, नितेश हाडप, प्रवीण आगिवले, साहिल हाडप, जगन्नाथ हाडप आदी प्रमुखांसह ग्रामस्थांनी व्यवस्थापक आणि खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन पवार यांना निवेदन दिले आहे. नावंढे गावाजवळ गोदरेज कंपनीचे कन्स्ट्रॅशनचे काम सुरु असून या कामासाठी गावकर्‍यांच्या जमिनी काही वर्षापूर्वी कवडीमोल भावात कंपनीने खरेदी केलेल्या आहेत.
 
त्यावेळी कंपनीने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे ओशासन आम्हाला दिले होते. परंतु आता ते ओशासन पूर्ण होताना दिसत नाही, तरी कन्ट्रशन कामाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत नसेल तर आम्ही सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसणार असून या काळात होणार्‍या सर्व घडामोडींना संबंधित कंपनी प्रशासन जबाबदारी असेल त्यामुळे आमच्या निवेदनाची दखल घ्या दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपात आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले यांनी दिला आहे.