उरण । तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायत हद्दीतील खालच्या आळीतील अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत निधीतून सुमारे 2 लाख 90 हजार रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अडचणी येत होत्या, मात्र आता रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हा रस्ता पिरकोन गावाच्या थेट सरपंच कलावती पाटील, माजी सरपंच कै. वाय. गावंड, तसेच ग्रामपंचायत सदस्य राजश्री म्हात्रे, दीपक पाटील, प्रियंका पाटील, अंकित पाटील व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाला.
रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, कंत्राटदार विशाल गावंड, गुड्डू शर्मा, विठ्ठल गावंड, रमण गावंड, राकेश गावंड, सुजीत गावंड, परशुराम गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.