नाताळची सुट्टी; मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची कोंडी

By Raigad Times    26-Dec-2025
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीत अडकून पडले. नाताळचा सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
 
गुरुवारी सकाळपासून रस्ते वाहतूक कोलमडली होती. वाहनांची संख्या वाढल्याने घाट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सात ते आठ किलोमिटरच हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागत होते. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच वैतागले होते.
 
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक देण्या गतीने सुरु होती. काही बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने या समस्येत अधिकच भर पडत होती. वडखळ ते अलिबाग या मार्गावरही वाहतूक संथ गतीने सुरू होती. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने वाहतुकीचे नियमन करण्यात पोलीस अपयशी ठरत होते.