मुरुडमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाकरे गटाशी दोस्ती राष्ट्रवादीच्या पथ्यावर

By Raigad Times    22-Dec-2025
Total Views |
 murud
 
मुरुड । मुरुड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्ष कल्पना पाटील यांचा पराभव केला.
 
कल्पना पाटील यांचे पती आणि शिवसेनेचे मुरुड येथील प्रमुख नेते संदीप पाटील यांची मतदानाच्या आदल्या रात्री तब्येत खालावल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले होते. शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा ठरली. तसेच राष्ट्रवादीसोबत शिवसेना ठाकरे गटाने केलेली दिलजमाई याचादेखील फायदा राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आराधना दांडेकर यांना झाल्याची चर्चा आहे.