रोह्यात वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केले पूर्ण...
By Raigad Times 22-Dec-2025
Total Views |
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार वनश्री समीर शेडगे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अवघ्या सहा मतांनी पराभव झाला होता.
त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न वनश्री यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. वनश्री यांना 8 हजार 586 मते तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमदेवार शिल्पा अशोक धोत्रे यांना 3 हजार 891 मते मिळाली. 231 मतदारांनी नोटाला मतदान केले.