दहा नगरपालिकांमधून होणार नगराध्यक्ष , २१७ नगरसेवकांची निवड ! २ लाख ३७ हजार मतदार बजावणार आपला हक्क

नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर | रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

By Raigad Times    06-Nov-2025
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड- जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत १०७ प्रभागांतून २१७ सदस्य निवडण्यात येणार आहेत.
 
यासाठी २ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदान करु शकणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. खोपोली नगरपरिषदेत १५ विभागातून ३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी ६२ हजार ७४, मतदार मतदान करु शकणार आहेत. अलिबाग नगर परिषदेत दहा विभागांतून २० सदस्य निवडूण देणार आहेत.
 
यासाठी शहरातील १६ हजार ३५४ मतदार मतदान करु शकणार आहेत. श्रीवर्धन शहरातील दहा विभागांतून २० सदस्य निवडून द्यावचे आहेत. यासाठी १२ हजार ६३७ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. मुरुड-जंजिरा नगर परिषदेच्या दहा विभागांतून २० सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यासाठी ११ हजार ५४४ मतदार मतदान करु शकतील. रोहा नगर परिषदेतही १० विभागातून २० सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
 
या सदस्यांसाठी १७ हजार ६६९ मतदार मतदानाचा हक्क बजावून शकणार आहेत. महाडमधील १० विभागांतून २० सदस्य निवडणूक दिले जाणार आहेत. यासाठी २३ हजार १२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पेण नगरपरिषदेत १२ विभागांमध्ये २४ सदस्यांची निवड करणार आहेत. यासाठी ३३ हजार ८७५ मतदार मतदान करु शकणार आहेत. उरण नगरपरिषदेत १० विभागांतून २१ सदस्य निवडून द्यायचे आहेत.
 
यासाठी २६ हजार २१४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कर्जतमध्येही १० विभागांतून २१ सदस्या निवडून द्यायचे आहेत. यासाठी २९ हजार ९५७ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. माथेरान नगरपरिषदेत १० विभागातून २० सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी ४ हजार ५५, मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. असे एकूण दहा नगरपालिकांमधील १०७ विभागांतून २१७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी २ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावून शकणार आहेत.
एकूण नगरपरिषद : १०
एकूण प्रभाग : १०७
एकूण सदस्य निवडायचे : २१७
एकूण मतदार : २ लाख ३७ हजार ५०३
४१५६ दुबार मतदार
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकामध्ये ४ हजार १५६ दुबार मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक खोपोली नगरपरिषदेत ८९१ तर सर्वात कमी १८ दुबार मतदार माथेरानमध्ये आहेत. अलिबागमध्ये २४२ मतदार आहेत. श्रीवर्धन नगरपरिषद १३१, मुरूड नगरपरिषद ६९, रोहा नगरपरिषद ६२, महाड ३५९, पेणमध्ये ७५४, उरणमध्ये ७८१, कजतमध्ये ७१७ आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध: ३१ ऑक्टोबर २०२५
निवडणूक कार्यक्रम जारी : ६ नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन अर्ज भरण्याचा कालावधी: १० ते १७ नोव्हेंबर (दुपारी २ पर्यंत)
नामनिर्देशन स्वीकृती: १० ते १७ नोव्हेंबर (३ पर्यंत, रविवार सुट्टी)
नामनिर्देशन छाननी व वैध उमेदवारांची यादी: १८ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख: १९ ते २१ नोव्हेंबर, दुपारी ३ पर्यंत
अपील कालावधी : २१ ते २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत
निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध: २६ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस: २ डिसेंबर २०२५ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी व निकाल जाहीर: ३ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० पासून
निकाल राजपत्रात प्रसिद्धी: १० डिसेंबर २०२५ पूर्वी
जिल्ह्यातील दहा नगरपालीकांच्या निवडणूक जाहिर झाल्यामुळे नगरपालीका आणि लागून सिमा असलेल्या ग्रामपंचयात हददीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या परिसरात मतदार प्रभावीत होईल असे कुटलेही कृत्य कोणीही करु नये. आचारसंहितेचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. - किसन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी