रोह्यात राष्ट्रवादीचे खाते खुलले; राजू जैन बिनविरोध विजयी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By Raigad Times    20-Nov-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग । रोहाअष्टमी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गँ्रड ओपनिंग दिली आहे. या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार राजू जैन हे बिनविरोध निवडून आले आहेत. रोहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होमग्राऊंड समजले जाते. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही उमेदवार उभे करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
असे असले तरी निवडणुकीच्या सुरुवातीला मिळालेला हा विजय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. दरम्यान, विजयानंतर राजू जैन यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांशी संवाद साधत त्यांच्या प्रभागांचा आढावा घेतला. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.