नवीन पनवेल | चिकनच्या हड्डीवरून लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अप्पू वंडाल उर्फ बाब्या (रा.नौपाडा, कामोठे) याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात त्रगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान मोहम्मद इस्लाम सिद्दिकी हा कामोठे, सेक्टर २२ येथे राहत असून तो स्टार चिकन शॉप नौपाडा गाव, कामोठे येथे चालवितो. २१ ऑक्टोबर रोजी अप्पू वंडाल हा शॉपवर चिकनची राहिलेली हड्डी मागू लागला. यावेळी दुकानावर गिर्हाईक असल्याने सलमानने त्याला थांबायला सांगितले. त्याचा राग आल्याने शिवीगाळ करत, चिकन विक्रेत्याला बांबूने मारहाण करून त्याला जखमी केले.