नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवाळीच्या काळात आकाशकंदील हवेत सोडणे, विक्री करणे व साठा ठेवणे बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, ही बंदी १७ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राहणार आहे. आकाशकंदील हवेत सोडल्यास आग, मालमत्तेचे नुकसान किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.