जेएनपीएच्या अध्यक्षपदी आयएएस गौरव दयाळ यांची नियुक्ती

By Raigad Times    13-Oct-2025
Total Views |
 uran
 
उरण । आयएएस अधिकारी गौरव दयाळ यांची केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण (जेएनपीए) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रभावी राहणार आहे. संजय सेठी यांच्या कार्यकाळानंतर हे पद दीड-दोन वर्ष रिक्त राहिले होते, त्याऐवजी उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
गौरव दयाळ यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीएवर विविध महत्त्वाचे प्रकल्प चालू आहेत. यात बंदरासंबंधित सेझ प्रकल्प, हरित बंदरासाठी ई-वाहने, परिसराचे सुशोभीकरण, मुंबई-दिल्ली रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर, बंदरातील कामगार वसाहतीतील सीबीएससी विद्यालय उभारणी आणि सिंगापूरच्या बीएमसीटी द्वितीय टप्प्याचे उद्घाटन यांचा समावेश आहे.
 
कंटेनर हाताळणीची क्षमता 73 लाखावरून 1 कोटीपर्यंत वाढविण्यात येणार असून, यामुळे जेएनपीएचे जागतिक स्थान 96 वरून 23 वर पोहचले असून देशातील कंटेनर हाताळणीमध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे.