कर्जत | कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथे पहाटे घरात घुसून धारदार शस्त्र, पिस्तूल व रॉडने हल्ला करून कुटुंबातील चार जणांना गंभीर जखमी केले होते, याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. घटना प्रतीक शिंदे (वय २८) यांच्या घरात घडली.
किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव, जय सुनील साबळे आणि आणखी दोन जणांनी पहाटेच कट रचून हल्ला केला. हल्ल्यात प्रतीक शिंदे, त्यांचे आई-वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले; घरातील वस्तू व परिसरातील रिक्षांच्या काचाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला, प्राथमिक तपासानुसार हा हल्ला कौटुंबिक मतभेद आणि जागा-जमिनीच्या वादातून घडल्याचा अंदाज आहे. दोघे हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. घटना परिसरात तणाव निर्माण करणारी ठरली आहे.