ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!...तो जीआर फक्त मराठवाड्यापुरताच!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नवी माहिती

By Raigad Times    12-Oct-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे नियोजित षङयंत्र आहे. २ सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. मराठवाड्याबाहेरचा हा जीआर नसल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बैठक झाली तेव्हा विजय वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते.
 
प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला होता. या जीआरचा कोणीच दुरुपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, या मागणीसाठी राज्यभर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. गुरुवारी कोकणातील कुणबी समाज मुंबईत धडकाला होता. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) नागपूर अन्य भागात आंदोलने पहायला मिळाली.
 
यावर बोलताना बावनकुळे यांनी वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचे आरक्षण गेले, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रीमंडळात होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिल्याचे ते म्हणाले. सत्तेत असताना काही करायचे नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा. ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं वचन शिष्टमंडळाला दिले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
 
आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजचं हित आमचे सरकार जाऊ देणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळं ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे असे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील पूर हमीच सर्वात मोठ पॅकेज आहे. मदत पोहचायला वेळ लागेल, मात्र दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचेल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अस बावनकुळे म्हणाले.