अलिबाग । रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिक मागास वर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत (ड्रॉ) पद्धतीने प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागा आरक्षणासंबंधीची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या सोडतीची कार्यवाही 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी होईल, तर जिल्हा परिषदेसाठीची सोडत दुपारी 12 वाजता घेण्यात येईल.
सोडत सभेची ठिकाणे पुढीलप्रमाणे जिल्हा परिषद रायगड :
नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड (दुपारी 12 वाजता) पनवेल : आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फळके नाट्यगृह, पनवेल
कर्जत : प्रशासकीय भवन, तहसिलदार कार्यालय, कर्जत
खालापूर : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, खालापूर
सुधागड : श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली भक्त निवास क्र. 1 सभागृह, रायगड
पेण : उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण
उरण : पंचायत समिती सभागृह, उरण
अलिबाग : नगरपरिषद सभागृह, अलिबाग
मुरुड : महाराष्ट्र भूषण डॉ. दि.शि. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पंचायत समिती, मुरुड
रोहा : ज्येष्ठ नागरिक सभागृह, नगरपरिषद, रोहा
तळा : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पंचायत समिती, तळा
माणगाव: मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसिलदार कार्यालय, माणगाव
म्हसळा : पंचायत समिती सभागृह, म्हसळा
श्रीवर्धन : मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, तहसिलदार कार्यालय, श्रीवर्धन
महाड : बहुउद्देशीय हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड
पोलादपूर : कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह, पोलादपूर या सोडतीतून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील विविध आरक्षित जागांची निश्चिती केली जाणार असून, यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अधिकृतरीत्या सुरू होणार आहे.