अलिबाग | अलिबाग तालुक्यातील पाटील ब्रदर हॉटेल रिसॉर्ट, पांडवादेवी येथे रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 पेक्षा अधिक विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजा केणी यांनी केले आहे. संपूर्ण मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याला 100 टक्के नोकरीची संधी मिळणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र दिले जाईल.
तसेच, उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यात येईल. आय.टी.आय., हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रनिकेतन आदी क्षेत्रांत 3 हजारहुन अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत. या मेळाव्यात नर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बँकींग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, सिक्युरिटी, टेलिकॉम व इतर क्षेत्रांत संधी मिळणार आहे. पात्रता किमान आठवी पास ते उच्च शिक्षण असून, वयोगट 18 ते 35 वर्षे आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती मेळाव्या आयोजक राजा केणी यांनी दिली.