खगोलशास्त्रज्ञ संदीप जाधव यांची ‘आयपीएस’च्या ज्येष्ठ वैज्ञानिकपदी नियुक्ती

By Raigad Times    10-Oct-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई । खगोलशास्त्र आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन प्लॅनेटरी सोसायटीच्या ज्येष्ठ वैज्ञानिकपदी खगोलशास्त्रज्ञ संदीप अनंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. बी.बी. रावल यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
 
इंडियन प्लॅनेटरी सोसायटी ही देशातील एक प्रतिष्ठित संस्था असून खगोलशास्त्र आणि अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच नवोदित वैज्ञानिकांना प्रेरणा देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेने आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ती आज देशातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्थांपैकी एक मानली जाते. संदीप यांच्यासोबत विद्यार्थी अवस्थेत काम केले आहे. लहान वयात स्वतःचे तारांगण उभारणारा तो देशातील पहिला विद्यार्थी ठरला.
 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील उंब्रे येथे त्यांनी स्थापन केलेले ‘तारांगण’ माझ्याच हस्ते उद्घाटित करण्यात आले होते आज त्याच प्रतिभावान तरुणाने आपल्या मेहनतीने यशाच्या शिखरावर झेप घेतली आहे, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.” अशा शब्दांत डॉ. रावल यांनी कौतुक केले. संदीप जाधव त्यांच्या संशोधनांवर आधारित अनेक शोधनिबंध आणि लेख प्रकाशित झाले असून काही जागतिक जर्नल्समध्ये प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत.
 
याशिवाय, ते विज्ञानकथा लेखक म्हणूनही प्रसिद्ध असून त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. पेण तालुक्यातील उंब्रे येथील त्यांच्या तारांगणाचे लवकरच विस्तारीकरण होऊन ते विद्यार्थ्यांसाठी आणि विज्ञानप्रेमींसाठी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. इंडियन प्लॅनेटरी सोसायटीत सामील होण्यापूर्वी त्यांनी विविध प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक सन्मान आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी लाभली आहे.