पनवेल । दि.बा.साहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. या लढ्यात गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने, मोर्चे आणि शेकडो बैठका पार पडल्या.
मात्र आता घुसखोरी करु पाहणारे खासदार बाळ्यामामा होते कुठे? असा सवाल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला आहे. परिषद आयोजित केली होती. या परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की, “सुरेश म्हात्रे आमच्या विभागाचे खासदारच नाहीत, त्यामुळे त्यांना या लढ्याचे महत्त्व व इतिहास माहित नाही. फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो शायनिंगसाठी ते पुढे येत आहेत.
प्रकल्पग्रस्त आणि समितीला विश्वासात न घेता बाळयामामा म्हात्रे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी म्हटले आहे. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती सन 2020 पासून दिबांच्या नावासाठी सतत प्रयत्नशील आहे. “दि.बा. साहेबांचे नाव मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी समिती दक्ष आहे. जनतेच्या रेट्यामुळेच पूर्वीच्या सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंजूर केलेले नाव बदलले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विमान टेक ऑफ होताच दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव जाहीर होईल, असे म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. रामशेठ ठाकूर म्हणाले की, 6 ऑक्टोबरला बाळ्यामामा म्हात्रे मोर्चा काढण्याची घोषणा करत आहेत, परंतु त्या बैठकीत समितीचा कुणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता.
तसेच, त्यांची मनमानी हालचाल भूमिपुत्रांना फसविण्याचा प्रयत्न आहे. “समितीची एकमुखी निर्णय प्रक्रिया हाच आमचा मार्ग असेल आणि भूमिपुत्रांच्या इच्छेनुसारच पुढे पाऊल टाकले जाईल”,असे त्यांनी अधोरेखित केले. नाही. आम्ही समितीच्या निर्णयानेच पुढे पाऊल टाकणार या आंदोलनाचा प्रकल्पग्रस्त समितीशी काही संबंध आहोत. समितीने ठरविलेल्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न बाळ्यामामा म्हात्रे यांनी करु नये, असे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.